Mumbai Local | मुंबईकडे येणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कोणत्या स्थानकात मालगाडीचं इंजिन फेल?

Mumbai Local | मुंबईकडे येणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कोणत्या स्थानकात मालगाडीचं इंजिन फेल?

| Updated on: Sep 26, 2023 | 2:00 PM

VIDEO | मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, मध्य रेल्वेच्या खर्डी आणि उंबरमाळी रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीचं इंजिन फेल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवाशांमध्ये नाराजी

मुंबई, २६ सप्टेंबर २०२३ | मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या दिशेने येणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेच्या खर्डी आणि उंबरमाळी रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीचं इंजिन फेल झाल्याची माहिती समोर आली आहे. बारा ते साडेबाराच्या दरम्यान ही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर खर्डी आणि उंबरमाळी रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीचं इंजिन फेल झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे. मागील अर्ध्या ते एक तासापासून मध्य रेल्वेच्या खर्डी आणि उंबरमाळी रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मालगाडीचं इंजिन फेल झाल्याने त्यामध्ये कधी दुरूस्ती करण्यात येणार याबाबतची कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Published on: Sep 26, 2023 01:53 PM