Kanchanjunga Express Accident : पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात, कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक, अनेक बोगी उलटल्या अन्…
सियालदहकडे जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. मालगाडीने मागून धडक दिल्यामुळे कांचनजंगा एक्स्प्रेसच्या अनेक बोगी रुळावरून घसरल्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला.
पश्चिम बंगालमधील एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. सियालदहकडे जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या धडकेमुळे कांचनजंगा एक्स्प्रेसच्या अनेक बोगी रुळावरून घसरल्या. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. मालगाडीने लगेचच सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आगरतळा ते सियालदहला जाणारी ट्रेन क्रमांक 13174 कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून मालगाडीने धडक दिल्यामुळे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.