इंदापुरात शिकाऊ विमान कोसळले, पायलट मुलगी किरकोळ जखमी
पुण्यातील इंदापूर तालुक्यात एक शिकाऊ विमान कोसळलं. तालुक्यातील कडबनवाडी याठिकाणी हे विमान कोसळलं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुण्यातील इंदापूर तालुक्यात एक शिकाऊ विमान कोसळलं. तालुक्यातील कडबनवाडी याठिकाणी हे विमान कोसळलं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक महिला पायलट प्रशिक्षण घेत होती, ती किरकोळ जखमी झाली. बारामतीतील विमानतळावरून सकाळी उड्डाण केलेलं हे विमान कडबनवाडीजवळ कोसळलं. काही तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. बारामतीत ‘कार्व्हर एव्हिएशन’कडून महिला पायलटचं प्रशिक्षण दिलं जातं. विमान कोसळल्याची घटना समजताच शेजारच्या वस्तीतील तरुण त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी महिला पायलटला सुरक्षित बाहेर काढलं.