महाविकास आघाडी सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार? IAS, IPS अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत मोठी बातमी

महाविकास आघाडी सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार? IAS, IPS अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत मोठी बातमी

| Updated on: Aug 29, 2022 | 9:43 AM

IAS IPS Officer Transfer Order News : फडणवीस सरकारशी अत्यंत निकटता ठेवणारे आणि सरकार बदलताच रात्रीतून निष्ठा बदलणाऱ्या अधिकाऱ्यांनाही फटका बसू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

मुंबई : राज्यात आयएएस, आयपीएसच्या मोठ्या प्रमाणात बदल्या (IAS IPS Officer Transfer) होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (MVA Government) गोटातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवरून दूर केले जाणार असल्याची माहिती समोर येतेय. फडणवीस सरकारशी अत्यंत निकटता ठेवणारे आणि सरकार बदलताच (Maharashtra Political Crisis) रात्रीतून निष्ठा बदलणाऱ्या अधिकाऱ्यांनाही फटका बसू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आयएएस आणि आयपीएस अधिकारी हे आवडीच्या पोस्टिंगसाठी जोरदार लॉबिग करत आसल्याची माहिती मिळतेय. नेमका आता हा बदलीचा आदेश केव्हा येतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अधिकारी वर्गात बदलीच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता कुणाची कुठे बदली होते? कोणत्या अधिकाऱ्यांना जवळ केलं जातं आणि कोणते अधिकारी दूर ठेवले जातात, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Aug 29, 2022 09:40 AM