Special Report | विलीनीकरणावर बैठकीत काय ठरलं?

| Updated on: Nov 13, 2021 | 10:53 PM

तोडगा काढण्यासाठी शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब, आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांची सह्याद्रीवर बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे वृत्त आहे. ही दोन दिवसांतली दुसरी बैठक आहे. यात संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यावर परिवहन मंत्री राजी असून, तसा प्रस्ताव समितीला पाठवण्यात येणार आहे.

मुंबईः परिवहन मंत्री अनिल परब आणि शिष्टमंडळात शनिवारी सकारात्मक चर्चा झाली असून, यात एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यावर सहमती झाल्याचे समजते. साऱ्या घडामोडीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाईल, अशी चर्चा आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब, आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांची सह्याद्रीवर बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे वृत्त आहे. ही दोन दिवसांतली दुसरी बैठक आहे. यात संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यावर परिवहन मंत्री राजी असून, तसा प्रस्ताव समितीला पाठवण्यात येणार आहे. यावर पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आहे. परिणामी एसटीचा संप मागे घेण्याच्या दिशेने पावले पडत आहेत.