Special Report | चार महिन्यांपासून सुरु असलेला ST चा संप आता तरी संपणार का? -Tv9

Special Report | चार महिन्यांपासून सुरु असलेला ST चा संप आता तरी संपणार का? -Tv9

| Updated on: Mar 04, 2022 | 10:08 PM

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नाही, असे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने हा अहवाल न्यायालयात मांडला.

मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांनी 10 मार्चच्या आत कामावर यावे. अन्यथा सारे पर्याय खुले आहेत, असा इशारा शुक्रवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना दिला. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नाही, असे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने हा अहवाल न्यायालयात मांडला. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी हा अहवाल आज विधानसभेत पटलावर ठेवला. अपेक्षेप्रमाणे दुपारी परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कामावर यावे आणि आपली सेवा सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले. परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, सध्या 52 हजार कर्मचारी कामावर नाहीत. त्यातील 30 हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. कोणाचे निलंबन झाले आहे, तर कोणाला बडतर्फीची नोटीस बजावली आहे. कोणाला बडतर्फ केले आहे. या कर्मचाऱ्यांनी येत्या दहा मार्चपर्यंत कामावर यावे. त्यांची रोजी-रोटी जावू नये, अशीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारची इच्छा आहे. हे कर्मचारी कामावर आले, तर त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.