Anil Parab | ST कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीची ऑफर, 24 नोव्हेंबरला पुन्हा बैठक- अनिल परब

| Updated on: Nov 23, 2021 | 8:34 PM

कामगारांना अंतरिम वाढ देण्याचा पर्याय दिला आहे. सकारात्मक चर्चा झाली. आम्ही ऑफर दिली आहे. उद्या सकाळी 11 वाजता या संदर्भात पुन्हा बैठक होणार आहे, असं परब म्हणाले.

मुंबई: एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे संपावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीचे प्रतिनिधी यांच्यात आज बैठक झाली. सुमारे दोन तास ही बैठक चालली. त्यानंतर अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. कोर्टाने विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा जो काही अहवाल येईल तो आम्ही मान्य करू. पण तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही. त्यामुळे कामगारांना अंतरिम वाढ देण्याचा पर्याय दिला आहे. सकारात्मक चर्चा झाली. आम्ही ऑफर दिली आहे. उद्या सकाळी 11 वाजता या संदर्भात पुन्हा बैठक होणार आहे, असं परब म्हणाले.