परिवहन मंत्र्यांनी हट्ट बंद करावा आणि न्याय देण्याच्या दृष्टीने चर्चेला लागावं : Narayan Rane
13 दिवस उलटून गेले असले तरी राज्य सरकारकडून कोणताही ठोस तोडगा काढला जात नाहीये. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केलीय. तसेच या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा असेदेखील राणे यांनी म्हटले आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. मागील तेरा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान तसेच राज्यभर हे आंदोलन केले जात आहे. 13 दिवस उलटून गेले असले तरी राज्य सरकारकडून कोणताही ठोस तोडगा काढला जात नाहीये. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केलीय. तसेच या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा असेदेखील राणे यांनी म्हटले आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत एसटीचा विषय येतो. एसटीचा एवढे दिवस संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास 40 लोकांनी आत्महत्या केली. त्या सर्वांच्या घरची परिस्थिती भयावह आहे. असं असताना राज्य सरकार हा प्रश्न खेळवतंय या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय. त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हे सरकार गांभीर्याने घेत नाही. केंद्र सरकारने सरळ महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत. हा प्रश्न त्वरित मिटववा, अन्यथा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ वगैरे आदेश केंद्राने द्यावेत. मी स्वतः गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलेन. यातून मार्ग लवकरच काढावा आणि कर्मचाऱ्यांना वाचवावं एवढ मी सांगेन,” असं नारायण राणे म्हणाले. तसेच राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशीसुद्धा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बोलेन, असेदेखील त्यांनी सांगितले.