बाळासाहेबांनी लावलेलं झाड कोसळलं, किशोरी पेडणेकरांकडून पाहणी

बाळासाहेबांनी लावलेलं झाड कोसळलं, किशोरी पेडणेकरांकडून पाहणी

| Updated on: Aug 08, 2022 | 12:23 PM

दादर इथल्या शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते लावलेलं गुलमोहरचं झाड कोसळलं. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून याठिकाणची पाहणी करण्यात आली.

दादर इथल्या शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते लावलेलं गुलमोहरचं झाड कोसळलं. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून याठिकाणची पाहणी करण्यात आली. झाड पडल्यानं गेटवरील लोखंडी रेलिंगही तुटली. शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मारकाजवळ असलेलं हे गुलमोहराचं झाडं कोसळलंय. मुंबईत रविवारपासून जोरदार पाऊस आहे. रविवारी मध्यरात्री हे गुलमोहराचं झाड कोसळलं. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे हे झाड कोसळल्याची माहिती आहे.

Published on: Aug 08, 2022 12:23 PM