Trupti Desai : ‘धस खोक्याचे आका…त्यांना हिरो व्हायचंय’, त्या गंभीर आरोपांवरून तृप्ती देसाईंचा धसांवर हल्लाबोल
खोक्या भोसले प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता, असा आरोप सुरेश धसांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून केला. यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘सुरेश धस हे खोक्याचे आका आहेत. सुरेश धस आणि खोक्याचे संबंध सोशल मीडियातील फोटोवरून समोर आले आहे. ज्याप्रमाणे वाल्मिक कराडचे आका धनंजय मुंडे आहेत, असं म्हणज सुरेश धस धनंजय मुंडेंचे पुरावे बाहेर काढत होते, तसंच सुरेश धसांचे पुरावे समोर येत आहेत.’, अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी सुरेश धसांनी केलेल्या गंभीर आरोपांवर दिली. पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘खोक्याने सुरेश धसांना कोणते डब्बे पुरवले हे फक्त सुरेश धस आणि खोक्याला माहितीये. खोक्याला सुरक्षित बाहेर काढले पाहिजे आणि स्वतः बदनाम नाही झाले पाहिजे, याकरता सुरेश धस बाऊ करत आहेत. त्यांना खरंच बिश्नोई गँगची धमकी आली असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार का केली नाही.’, असं म्हणत सुरेश धसांचा गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का? असा सवालही तृप्ती देसाई यांनी केलाय. तर खोक्या भोसले प्रकरणात सुरेश धसांना व्हिलन ठरवण्यात आल्याचा आरोप धस करताय मात्र धसांना कोणीच व्हिलन ठरवलं नाही पण बीडच्या राजकारणात त्यांना हिरो व्हायचंय, असं म्हणत तृप्ती देसाई यांनी धसांवर निशाणा साधला.

दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?

ट्रम्प यांचा मोठा निर्णय, आयात शुल्कावरून भारताला दिला जबरदस्त झटका

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
