Trupti Desai Video : ‘त्या’ 26 पोलीस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करा, तृप्ती देसाईंची थेट फडणवीसांकडे मागणी
'वाल्मिक कराडची टोळीचा पर्दाफाश करणं किंवा त्यांची दहशत बीड जिल्ह्यात थांबवायची असेल तर बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली बीड जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे', बघा व्हिडीओ तृप्ती देसाई नेमकं काय म्हणाल्या?
वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलीस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. इतकेच नाहीतर बीड जिल्ह्यातील २६ पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोपही तृप्ती देसाई यांनी केला आहे. ‘बीड जिल्ह्यात वाल्मिक कराडचं जाळं फार मोठ्या प्रमाणात आहे. वाल्मिक कराडच्या नजीकचे आणि मर्जीतील जे काही जवळचे पोलीस अधिकारी आहेत जे बीड जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. वाल्मिक कराड सध्या बीडच्या कारागृहात आहेत. बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जे काही पोलीस अधिकारी आहेत ते सर्वांच्या मर्जीने काम करतात किंवा काही मर्जीतले अधिकारी आहे त्यांची लिस्ट माझ्याकडे आहे.’, असं तृप्ती देसाई यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले, यापुढे सर्व केसेसचा पारदर्शकपणे तपास होणं गरजेचं आहे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली. वाल्मिक कराडची टोळीचा पर्दाफाश करणं किंवा त्यांची दहशत बीड जिल्ह्यात थांबवायची असेल तर बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली बीड जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे, असं मत ही तृप्ती देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. बघा व्हिडीओ नेमकं काय म्हणाल्या?