सशुल्क अभिषेक असण्यावर आक्षेप तृप्ती देसाईंनी मांडलं मत

“सशुल्क अभिषेक असण्यावर आक्षेप” तृप्ती देसाईंनी मांडलं मत

| Updated on: Jun 19, 2022 | 6:06 PM

शुल्क घेण्याच्या निर्णयावर भूमाता ब्रेगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतलेला आहे. हे शुल्क 500 रूपये असणार आहे आणि याच गोष्टीवर आक्षेप घेण्यात आलाय. ही सुविधा महिला आणि पुरुष दोघांनाही उपलब्ध करून देण्यात असल्याचं स्वागत आहेच परंतु शुल्कावर आक्षेप आहे

अहमदनगर: शनिशिंगणापूरला (ShaniShinganapur)आता भक्तांना स्वतः तेलाचा अभिषेक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीये. परंतु संस्थानाकडून ही सेवा सशुल्क करण्यात आलीये. चौथऱ्यावर जाऊन सशुल्क भक्तांना तेलाचा अभिषेक करण्यात येणार आहे, शुल्क घेण्याच्या निर्णयावर भूमाता ब्रेगेडच्या (Bhumata Brigade) तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी आक्षेप घेतलेला आहे. हे शुल्क 500 रूपये असणार आहे आणि याच गोष्टीवर आक्षेप घेण्यात आलाय. ही सुविधा महिला आणि पुरुष दोघांनाही उपलब्ध करून देण्यात असल्याचं स्वागत आहेच परंतु शुल्कावर आक्षेप आहे असं मत तृप्ती देसाईंनी मांडलंय.

Published on: Jun 19, 2022 06:06 PM