Assembly Election 2024 : जागावाटपावरून महायुती अन् मविआत रस्सीखेच? कोणाविरूद्ध कोण उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

Assembly Election 2024 : जागावाटपावरून महायुती अन् मविआत रस्सीखेच? कोणाविरूद्ध कोण उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

| Updated on: Aug 02, 2024 | 11:13 AM

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुजय विखे पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार झाले आहेत. स्वतः सुजय विखे पाटील यांनी राहुरी आणि संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर अहमदनगर लोकसभेतून शरद पवार गटाच्या निलश लंकेंनी सुजय विखे पाटलांचा पराभव केला होता

जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. कारण दिंडोरी मतदारसंघात अजित पवार गटाकडून नरहरी झिरवळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर यावर शिंदे गटाने आक्षेप नोंदवला आहे. दुसरीकडे सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुजय विखे पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार झाले आहेत. स्वतः सुजय विखे पाटील यांनी राहुरी आणि संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर अहमदनगर लोकसभेतून शरद पवार गटाच्या निलश लंकेंनी सुजय विखे पाटलांचा पराभव केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा सुजय विखे पाटील सज्ज झाले आहेत. तर ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये दोन उमेदवारांच्या नावावरून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. बघा स्पेशल रिपोर्ट कोणाविरूद्ध कोण लढणार?

Published on: Aug 02, 2024 11:13 AM