TET Exam | टीईटी पेपरफुटी प्रकरणी तुकाराम सुपेंना 23 डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी

| Updated on: Dec 17, 2021 | 9:06 PM

म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांचा घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी एमएसईसीचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.

पुणे: टीईटी परीक्षेत गैरप्रकार (Maha TET exam) झाल्याच्या संशयावरुन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त  आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी त्यांना काल चौकशीला बोलावल होत. म्हाडा पेपर फुटी प्रकरणात (Mhada Paper Scam) अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख (Pritish Deshmukh) याच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. पुणे सायबर च्या कार्यालयांमध्ये ही चौकशीकरुन अटक करण्यात आली आहे. म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांचा घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी एमएसईसीचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. गैरप्रकाराचा शोध घेण्यासाठी तुकाराम सुपे यांच्याकालपासून चौकशी करण्यात आल्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.