Special Report | सालियान, सुशांत अन् यवतमाळची तरुणी, नारायण राणे यांच्या वक्तव्याने कोण गोत्यात येणार?
मोदी@9 कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार भाषण केलं. भाषणाच्या सुरुवातीला राणे यांनी मोदी सरकारची कामं समजून सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. नारायण राणे यांच्या एका वक्तव्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
रत्नागिरी : मोदी@9 कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार भाषण केलं. भाषणाच्या सुरुवातीला राणे यांनी मोदी सरकारची कामं समजून सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. नारायण राणे यांच्या एका वक्तव्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुत आणि दिशा सालियन यांची हत्या झाल्याचा आरोप नारायण राणे यांनी पुन्हा एकदा केला आहे. हा आरोप करताना नारायण राणे यांनी यवतमाळमधील तरुणीचीही हत्या झाल्याचा दावा करत आपल्याच सरकारमधील एका मंत्र्याची अडचण केली. नारायण राणे नेमकं काय म्हणाले? यवतमाळच्या तुरुणीच्या हत्येचा आरोपामुळे कोणाच्या अडचणी वाढणार? यासाठी यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट नक्की पाहा…
Published on: Jun 28, 2023 09:01 AM