WITT Global Summit : ब्रॅड इंडिया आर्थिक क्षेत्रात कसा मजबूत होणार? बरूण दास यांनी मांडली भूमिका
देशातील सर्वात मोठं नेटवर्क असलेल्या टीव्ही9ने व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीटला आजपासून सुरूवात झाली आहे. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास उपस्थित होते.
नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : देशातील सर्वात मोठं नेटवर्क असलेल्या टीव्ही9ने व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीटला आजपासून सुरूवात झाली आहे. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास उपस्थित होते. बरुण दास यांनी कार्यक्रमात सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत केले. आज TV9 व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिटच्या दुसऱ्या आवृत्तीची दिमाखदार सुरूवात झाली आहे. टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कॉन्क्लेव्हची सुरुवात करताना ते म्हणाले, “पुढील दोन दिवसात, आम्ही अनेक आंतरराष्ट्रीय विचारवंत नेते, कॅबिनेट मंत्री आणि उद्योगपतींना आमंत्रित करणार आहोत.” पुढे त्यांनी असेही म्हटले की, आजची संध्याकाळ ही माझ्यासाठी अत्यंत खास असणार आहे कारण माझ्या हृदयाच्या अगदी जवळचे विषय येथे चर्चिले जाणार आहे आणि मी ते नमूद करायलाच हवे. कारण ग्लॅमर आणि ग्लिट्झ व्यतिरिक्त, ही अनोखी अविस्मरणीय संध्याकाळ असणार आहे, असे TV9 चे एमडी आणि सीईओ बरुण दास म्हणाले. दरम्यान, कान्क्लेव्हच्या उद्घाटनापूर्वी बरुण दास यांनी मंत्री अनुराग ठाकूर यांचं स्वागत केलं. त्यानंतर बरुण दास यांनी सोहळ्याचं प्रास्ताविक करत उपस्थितांशी संवाद साधला.