Tv9Vishesh | डोंगर कोसळला आणि गावच गायब झाले, वेदनादायक माळीण दुर्घटनेला 7 वर्ष पूर्ण

Tv9Vishesh | डोंगर कोसळला आणि गावच गायब झाले, वेदनादायक माळीण दुर्घटनेला 7 वर्ष पूर्ण

| Updated on: Jul 30, 2021 | 10:09 AM

भीमाशंकरच्या कुशीत वसलेले इवलेसे माळीण गाव. माळीण गाव मंचरपासून 50 तर पुण्यापासून 125 किमी अंतरावर आहे. 30 जुलै 2014 रोजी डोंगराचा कडा कोसळून माळीण गायब झाले. मुसळधार पावसामुळे डोंगराचा कडा माळीण गावावर कोसळला. अचानक घडलेल्या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही.

भीमाशंकरच्या कुशीत वसलेले इवलेसे माळीण गाव. माळीण गाव मंचरपासून 50 तर पुण्यापासून 125 किमी अंतरावर आहे. 30 जुलै 2014 रोजी डोंगराचा कडा कोसळून माळीण गायब झाले. मुसळधार पावसामुळे डोंगराचा कडा माळीण गावावर कोसळला. अचानक घडलेल्या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदात
संपूर्ण गावच ढिगाऱ्यात गाडले गेले. एसटी बसच्या कंडक्टरमुळे माळीण गावची घटना समोर आली होती. 40 कुटुंबातील 151 लोकांचा मृत्यू, तर 9 जण जखमी झाले आहेत. सलग 8 दिवस ढिगाऱ्याचे खोदकाम त्यातून 151 मृतदेह बाहेर काढले. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 8.50 लाखांची मदत देण्यात आली.