युक्रेनमधील भारतीयांना घेऊन वायुदलाची दोन विमाने दिल्लीत दाखल
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, युद्ध सुरू झाल्याने युक्रेनमधील हवाई वाहतूक बंद आहे. त्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. आता या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूपपणे भारतात परत आणले जात आहे. आज सकाळी युक्रेनमधील भारतीयांना घेऊन वायुदलाची दोन विमाने दिल्लीत दाखल झाली आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, युद्ध सुरू झाल्याने युक्रेनमधील हवाई वाहतूक बंद आहे. त्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. आता या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूपपणे भारतात परत आणले जात आहे. यासाठी ऑपरेशन गंगा नावाची मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले आहे. आज सकाळी युक्रेनमधील भारतीयांना घेऊन वायुदलाची दोन विमाने दिल्लीत दाखल झाली आहेत. भारतात परतल्यानंतर संरक्षण राज्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान सुखरूपपणे भारतात परतल्याने विद्यार्थ्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
Latest Videos