मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?

| Updated on: Jan 06, 2025 | 4:08 PM

मुंबईतील संवेदनशील भाग असलेल्या ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या दोन कारने प्रवेश केल्याचे सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांना ही बाब लक्षात आणून दिली.

मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या दोन खासगी कार घुसल्या असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून सबंधित कार चालकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. मुंबईतील संवेदनशील भाग असलेल्या ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या दोन कारने प्रवेश केल्याचे सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांना ही बाब लक्षात आणून दिली. यानंतर पोलिसांनी याप्रकरणात दखल घेत आरटीओला बोलवून बनावट नंबर प्लेटच्या गाडी चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. ताज हॉटेलमध्ये शिरणाऱ्या दोन्ही कारवर MH 01 EE 2388 हा नंबर आढळून आला. इतकंच नाहीतर त्या कार देखील सारख्याच असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी कारची बानवट प्लेट कोणती आणि खरी कोणती याचा तपास करण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांना बोलवून घेतले. त्यानंतर बनावट नंबर प्लेट असलेली गाडी स्पष्ट झाली. बनावट नंबर प्लेट असलेली गाडी पोलिसांनी कुलाबा पोलीस ठाण्यात आणली. कुलाबा पोलीस ठाण्यात त्या कार चालकाची कसून चौकशी केली जात आहे. त्या चालकाने कार ताज हॉटेलमध्ये का आणली. त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे.

Published on: Jan 06, 2025 03:37 PM