Pune Bullock Cart Race | मावळमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, शर्यत पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी

| Updated on: Feb 12, 2022 | 7:40 PM

दोन दिवसात मावळ तालुक्यात नाणोली गावामध्ये 354 बैलगाडे धावनार तर आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे 750 गाडे धावनार मोठ्या संघर्षानंतर ही बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने ह्या स्पर्धेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालंय.

मावळ : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बैलगाडा शर्यत बंदी उठल्यावर मावळ आणि आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलंय. दोन दिवसात मावळ तालुक्यात नाणोली गावामध्ये 354 बैलगाडे धावणार तर आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे 750 गाडे धावणार आहेत. मोठ्या संघर्षानंतर ही बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने ह्या स्पर्धेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालंय. प्रामुख्याने ह्या बैलगाडा शर्यतीमध्ये साधारणपणे 400 फूट बैलगाडा घाटाची लांबी असते. 12 सेकंद पेक्षा कमी कालावधीत हा बैलगाडा सर करावा लागतो जो बैलगाडा 12 सेकंदमध्ये हा घाट सर करतो त्याला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस आणि भेट वस्तू मिळत असतात ह्या शर्यतीमध्ये दोन बैलजोड्या मिळून हा घाट सर करत असतात यामध्ये ह्या शर्यतीमध्ये जर पहिल्या क्रमांकावर 10 बैलगाडे आले तर त्यांना विभागून संबंधित पहिले बक्षीस आणि भेट वस्तू दिले जात असतात