Sangli Congress | सांगली जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर कदम आणि वसंतदादा गटात संघर्ष
जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या निमित्ताने सांगली जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी आता समोर आली आहे. कदम आणि दादा गटा या दोन्हींमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये कदम गटाने आपलं वर्चस्व राखला आहे, त्यामुळे नाराज दादा गटाने सवतासुभा मांडलाय.
जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या निमित्ताने सांगली जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी आता समोर आली आहे. कदम आणि दादा गटा या दोन्हींमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये कदम गटाने आपलं वर्चस्व राखला आहे, त्यामुळे नाराज दादा गटाने सवतासुभा मांडलाय. नूतन जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांच्या कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते पार पडलेल्या सत्काराकडे दादा गटाने पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले आहे.
सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी आमदार विक्रम सावंत यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष व आमदार विक्रम सावंत यांचा सत्कार पार पडला. याप्रसंगी आमदार मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.