Special Report | मोदींच्या मंत्रिमंडळातून महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना डच्चू

Special Report | मोदींच्या मंत्रिमंडळातून महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना डच्चू

| Updated on: Jul 07, 2021 | 9:23 PM

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत (PM Cabinet Reshuffle). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील पर्यावरण आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील पर्यावरण आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावरुन मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात नव्या 43 चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे (Two ministers from Maharashtra removed from Narendra Modi’s cabinet)

दिल्लीत आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे (PM Cabinet Reshuffle). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 7 रेसकोर्स हे निवासस्थान या राजकीय घडामोडींचं केंद्र बनलं आहे. ज्या संभाव्य नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. त्यांच्याशी मोदींनी आज संवाद साधला. सरकारची कामे, देशाची आणि राज्यांची परिस्थिती, आव्हाने आणि नव्या मंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षा याबाबत मोदींनी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधला.

फोन जाताच राजीनामे

मोदींच्या घरी सुरू असलेल्या या मिटिंगवर कोण मंत्री होणार? यावर चर्चा रंगली होती. अनेक नेत्यांची नावंही चर्चेत आली होती. त्याचवेळी मोदींची या नेत्यांसोबतची मिटिंग संपली. त्यानंतर लगेचच काही मंत्र्यांना फोन गेले आणि लगेचच मंत्र्यांच्या राजीनाम्याचं सत्रं सुरू झालं, असं सूत्रांनी सांगितलं. थोडे नं थोडक्या तब्बल 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे नवीन मंत्री कोण होणार? यापेक्षा कुणाला घरी जावं लागलं याचीच चर्चा रंगली.

या 12 मंत्र्यांनी दिला राजीनामा

1) थावरचंद गहलोत
2) सदानंद गौड़ा
3) रविशंकर प्रसाद
4) रमेश पोखरियाल निशंक
5) डॉ. हर्षवर्धन
6) प्रकाश जावडेकर
7) बाबुल सुप्रियो
8) संतोष गंगवार
9) संजय धोत्रे
10) रतन लाल कटारिया
11) प्रताप सारंगी
12) देबोश्री चौधरी

हर्षवर्धन यांचा खांदेपालट होणार

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या खात्यात बदल होणार असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं. त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात हर्षवर्धन यांना अपयश आल्याने त्यांच्याकडून आरोग्य खातं काढून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. आरोग्य खात्याची जबाबदारी अनुभवी नेत्याकडे देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं.

महाराष्ट्रातील 4 नेत्यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी

केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 43 नेत्यांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील हे चार नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश

नारायण राणे
सर्बानंद सोनोवाल
डॉ. विरेंद्र कुमार
ज्योतिरादित्य सिंधिया
रामचंद्र प्रसाद सिंग
अश्विनी वैष्णव
पशुपती कुमार पारस
किरेन रिजीजू
राजकुमार सिंह
हरदीप सिंह पुरी
मनसुख मंडाविया
भुपेन्द्र यादव
पुरुषोत्तम रुपाला
जी. किशन रेड्डी
अनुराग सिंह ठाकूर
अनुप्रिया सिंह पटेल
डॉ. सत्यपाल सिंह बघेल
राजीव चंद्रशेखर
शोभा करंडलाजे
भानूप्रताप सिंग वर्मा
दर्शना विक्रम जरदोष
मीनाक्षी लेखी
अनपुर्णा देवी
ए. नारायण स्वामी
कौशल किशोर
अजय भट्ट
बी. एल. वर्मा
अजय कुमार
चौहान देवूसिंह
भागवत खुपा
कपिल पाटील
प्रतिमा भौमिक
डॉ. सुभाष सरकार
डॉ. भागवत कराड
डॉ. राजकुमार सिंह
डॉ. भारती पवार
बिस्वेश्वर तडू
शंतनु ठाकूर
डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
जॉन बरला
डॉ. एल. मुरगन
निसित प्रमाणिक

संबंधित बातम्या 
Published on: Jul 07, 2021 09:23 PM