भगवान भक्तीगडाआडून मंत्री धनंजय मुंडेंचा दबाव? तर महंत नामदेव शास्त्रींचा ‘राजकीय’ इशारा काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात महंत नामदेव शास्त्री यांनी केलेले वक्तव्य वादात आले आहे. मारेकऱ्यांची मानसिकता का समजून घेतली नाही? हत्येआधी त्यांना झालेली मारहाण का दाखवली नाही? असे म्हणत त्यांनी मिडीयावरच खापर फोडले
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या दोन महिन्यानंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेवर अप्रत्यक्षपणे मायेची फुंकर घातली आहे. धक्कादायक म्हणजे देशमुखांच्या मारेकऱ्यांची मानसिकता मिडीयाने का समजून घेतली नाही? देशमुखांच्या हत्येआधी मारेकऱ्यांना झालेली मारहाण ही दखल घेण्याजोगी आहे. असा भुवया उंचावणारे विधान भगवान गडाचे प्रमुख महंत असलेल्या व्यक्तीने केलं आहे. हैवानालाही लाजवेल असा खून पाडणाऱ्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची नामदेव शास्त्री सानप अप्रत्यक्षपणे चिंता वाहातायत. पण मारेकऱ्यांनी आधी एका दलित वॉचमनला मारहाण का केली? दुसऱ्या गावाचे लोक पवनचक्की प्रकल्पामध्ये टोळी करून का आले होते? आधी मारामारीची सुरुवात कोणी केली? गुन्हेगारी पार्श्वभूमीचे मारेकरी तिथे येऊन दमदाटी का करत होते? तक्रारीनुसार ते मारेकरी कोणती खंडणी वसूल करायला पोहोचले होते? त्यांनी पवनचक्की प्रकल्पातील अधिकाऱ्याला का मारलं? यावर नामदेव शास्त्री सानपांनी चकार शब्द काढला नाही. पण मारहाण करणाऱ्यांना काशीलात लावल्या म्हणून ज्यांनी एक निर्घृण खून केला, त्यांच्याच मानसिकतेबद्दल नामदेव शास्त्री सांनपांना पाझर फुटला आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती

बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण

संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य

सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप
