नायजेरिय नागरिकांना कोकेनची तस्करी प्रकरणी अटक, 176 कॅप्सुल मधून 29 कोटींचे कोकेन
मुंबई विमान तळावर कस्टम विभागाने कारवाई करत 29 कोटींचे कोकेन जप्त केले आहे. तर या प्रकरणी दोन नायजेरिय नागरिकांना अटक देखिल करण्यात आली आहे.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून कस्टम विभागाकडून विमान तळावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. या कारवाईत याच्याआधी हिरोईन, आणि कोकेनही जप्त करण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा मुंबई विमान तळावर कस्टम विभागाने कारवाई करत 29 कोटींचे कोकेन जप्त केले आहे. तर या प्रकरणी दोन नायजेरिय नागरिकांना अटक देखिल करण्यात आली आहे. त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले आसता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या नायजेरियन नागरिकांनी हे कोकेन 176 कॅप्सुल मधून आणले होते.
Published on: Mar 07, 2023 07:02 PM