शाहरुख खान याच्या 'मन्नत'मध्ये दोन अज्ञातांची घुसखोरी अन्...,

शाहरुख खान याच्या ‘मन्नत’मध्ये दोन अज्ञातांची घुसखोरी अन्…,

| Updated on: Mar 03, 2023 | 7:50 AM

VIDEO | शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याची भिंत फोडून प्रवेश करणाऱ्या दोन युवकांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यात दोन अज्ञात व्यक्तींनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मन्नत या बंगल्याची भिंत फोडून आत प्रवेश करणाऱ्या दोन युवकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. याप्रकऱणी वांद्रे पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता आपण दोघे गुजरातमधून आलो असून आणि त्यांना शाहरुखला भेटायचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 19 ते 20 वर्षे वयोगटातील दोन तरुणांना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांची चौकशी करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुजरातच्या या युवकांनी शाहरुख खानच्या बंगल्याची कोणतीही परवानगी न घेता आणि थेट भिंत तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published on: Mar 03, 2023 07:50 AM