रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्राला 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस, बघा पहिली झलक

रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्राला 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस, बघा पहिली झलक

| Updated on: Feb 03, 2023 | 2:58 PM

येत्या १० फेब्रुवारीपासून दोन वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रात सीएसएमटी ते शिर्डी तर दुसरी सीएसएमटी ते सोलापूर या मार्गावर धावणार आहे.

मुंबई : रेल्वे मंत्रालयातर्फे महाराष्ट्राला पुन्हा 2 नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट देण्यात येणार आहे. मुंबईतील वाडी बंदर येथील कारशेडमधून बघा वंदे भारत एक्सप्रेस पहिली झलक… मध्य रेल्वेवर या वंदे भारत एक्स्प्रेस दाखल झालेल्या आहेत. या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १० फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर असताना ग्रीन सिग्नल दाखवणार आहेत. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली वंदे भारत एक्स्प्रेस पहिल्यांदा मध्य रेल्वेवर धावणार आहे. मेक इन इंडियाचं उत्पादन असणाऱ्या या वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यासाठी सर्वसामान्य देखील उत्सुक आहेत. येत्या १० फेब्रुवारीपासून दोन वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रात धावणार आहे. पहिली वंदे भारत ही सीएसएमटी ते शिर्डी तर दुसरी सीएसएमटी ते सोलापूर या मार्गावर धावणार आहे.

Published on: Feb 03, 2023 02:58 PM