Kalyan Crime | पार्किंगमधून बाईक गायब, विचारले तर रेकॉर्ड बुकातील कागदच फाडला; मुजोर पार्किग चालकास पोलीस कोठडी
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या पार्किंगमधून एक बाईक गायब झाली. जेव्हा बाईक मालकाने बाईक कुठे आहे अशी विचारणा पार्किग चालकास केली. तेव्हा पार्किग चालकाने नोंदणी पुस्तकातून बाईक ठेवल्याचा कागदच फाडला. या मुजोर पार्किंग चालकाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या पार्किंगमधून एक बाईक गायब झाली. जेव्हा बाईक मालकाने बाईक कुठे आहे अशी विचारणा पार्किग चालकास केली. तेव्हा पार्किग चालकाने नोंदणी पुस्तकातून बाईक ठेवल्याचा कागदच फाडला. या मुजोर पार्किंग चालकाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. महेश शिंदे असे या पार्किंग चालकाचे नाव आहे. सध्या गायब झालेल्या बाईकचा शोध घेत आहेत. धक्कादायक म्हणजे या पार्किगमध्ये सीसीव्हीटी आणि सुरक्षिततेची यंत्रणा नसल्याने पार्किंग अधिकृत आहे का याचाही पोलीस तपास करणार आहेत.
Latest Videos