Thane | ठाण्यात चोरट्यांकडून दोन महिलांना माराहण
अनेक चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांच्याकडून चोरीस गेलेले साहित्य हस्तगत केलेले आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना सुरुच आहेत. कल्याणनजीक आटाळी मानी येथे रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे.
कल्याण : दोन महिलांना बेदम मारहाण(Beating) करुन घरातील ऐवज लुटून अज्ञात चोरटे फरार झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. दोन्ही महिलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून खडकपाडा पोलीस(Khadakpada Police) या घटनेचा तपास करीत आहेत. कल्याण डोंबिवलीत घरफोडी, वाहन चोरी, चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली आहे. पोलीस अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांच्याकडून चोरीस गेलेले साहित्य हस्तगत केलेले आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना सुरुच आहेत. कल्याणनजीक आटाळी मानी येथे रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे.
Latest Videos