Raigad | ...अन् दोन मैत्रिणी समुद्रात कोसळल्या, अलिबागमध्ये पॅरासेलिंगदरम्यान दुर्घटना

Raigad | …अन् दोन मैत्रिणी समुद्रात कोसळल्या, अलिबागमध्ये पॅरासेलिंगदरम्यान दुर्घटना

| Updated on: Dec 04, 2021 | 4:00 PM

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून घरात बसून असलेले लोक आता फिरण्यासाठी, पिकनीकसाठी बाहेर पडत आहेत. अलिबागमध्ये पॅरासेलिंग (parasailing in Alibaug) करण्यासाठीही नागरिक मोठी गर्दी करत आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून घरात बसून असलेले लोक आता फिरण्यासाठी, पिकनीकसाठी बाहेर पडत आहेत. अलिबागमध्ये पॅरासेलिंग (parasailing in Alibaug) करण्यासाठीही नागरिक मोठी गर्दी करत आहेत. मात्र, हेच पॅरासेलिंग करत असताना दोरी तुटल्याने एक अपघात झाला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये पॅरासेलिंगला गेलेल्या दोन मैत्रिणींसोबत एक भयावह प्रकार घडला आहे. दोन्ही मैत्रिणी पॅरासेलिंग करत होत्या. त्यांच्या बचावासाठी बोटीला बांधलेला दोर तुटला आणि दोघी 100 मीटर उंचीवरुन समुद्रात पडल्या. यावेळी त्याच बोटीत असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला. पण सुदैवानं दोन्ही महिलांनी लाईफ जॅकेट्स घातल्याने बोट दोघींपर्यंत पोहचेपर्यंत त्या लाटांवर तरंगत राहिल्या आणि बचावल्या. अलिबागच्या वर्सोली बीचवर पॅरासेलिंगवेळी 27 नोव्हेंबरला हा प्रकार घडला. या अपघातानं दोन्ही महिला आणि कुटुंबीय सध्या धक्क्यात आहेत.