अंबादास दानवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात? शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा गौप्यस्फोट
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आधीच खिळखिळ्या झालेल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार?, बघा कुणी केला गौप्यस्फोट
अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून आज सकाळीच अंबादास दानवे यांनी तीव्र निशाणा साधला. एकनाथ शिंदे हे चोरलेला धनुष्यबाण घेऊन रामाच्या चरणी पूजा करणार आहेत. मात्र हे चोरलेला धनुष्यबाण घेऊन जात आहेत. यात काय मर्दुमकी, असा सवाल अंबादास दानवे यांनी केलाय. तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असलेले अंबादास दानवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असा मोठा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ‘अंबादास दानवे यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलण्याशिवाय पर्याय नाही. कारण अंबादास दानवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं वातावरण आहे. शिंदे साहेबांवर टीका करणं त्यांना क्रमप्राप्तच आहे. पण मी शिंदे यांच्या संपर्कात नाही, हे दाखवण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे दुसऱ्याचं बघून फक्त टीका करतात. त्याला फार अर्थ नाही… असं उदय सामंत म्हणालेत.