Uday Samant : पुन्हा राजकीय भूंकप? ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्… उदय सामंतांचा मोठा दावा
एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेतील नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत. बघा उदय सामंत यांनी काय केला खळबळजनक दावा?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ आहेत, असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेतील नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केलं. जे अस्वस्थ आहेत ते आजही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलंय. उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार का? असा सवाल केला जात आहे. दरम्यान गेल्या वेळेला पाच जणांचा आकडा सांगितलेला ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आलेच पण आता आणखी सहा जण वेटिंगमध्ये असल्याचे म्हणत उदय सामंत यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. तर उदय सामंत यांनी केलेल्या या दाव्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उदय सामंत यांनी स्वतःच्या खात्याकडे बघावं नंतर आमच्यावर बोलावं, असं म्हणत उदय सामंतांवर पलटवार केलाय. ‘उद्यागमंत्री या नात्याने उदय सामंत यांनी एक मोठं पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी विभागाकडून त्यांना दुर्लक्ष केलं जातंय असं म्हटलं होतं. मला न विचारता परस्पर मिटींग करतात असं ते म्हणताय, त्यामुळे पहिले त्यांनी त्यांच्यातील अस्वस्थता दूर करावी’, असं म्हणत सचिन अहिर यांनी उदय सामंत यांना फटकारल्याचे पाहायला मिळाले.

मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप

कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट

कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा

वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
