रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा करणार नाही तर… उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य काय?
लोकसभेच्या त्या-त्या जागोवर प्रत्येक पक्ष आपला दावा सांगणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा करण्याचा प्रश्नच नाही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आमच्या हक्काची असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आमच्या हक्काची असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेणार तो मान्य असल्याचे म्हणत त्यांनी सांगितलं, ज्या ठिकाणी जे खासदार आहेत, तेच त्या मतदार संघातील जागेवर निवडणूक लढवतो. आता आमच्या बरोबर जे खासदार आलेत आणि तिकडे जे उरले आहेत, त्यांच्या जागाही आम्हीच लढवल्या आहेत. लोकसभेच्या त्या-त्या जागोवर प्रत्येक पक्ष आपला दावा सांगणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा करण्याचा प्रश्नच नाही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आमच्या हक्काची असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले. तर दावा केल्यानंतर कोणता निर्णय घ्यायचा याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे यावर कोणतीही चर्चा आमच्यात होत नाही. कारण आम्हाला आमच्या नेत्यावर मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.