शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओवर उदय सामंत म्हणतात, '...राजकारणातून संपवण्याचा डाव'

शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओवर उदय सामंत म्हणतात, ‘…राजकारणातून संपवण्याचा डाव’

| Updated on: Mar 13, 2023 | 3:27 PM

VIDEO | शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया, बघा काय म्हणाले?

मुंबई : शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक व्हीडिओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आला. दरम्यान ठाकरे गटातील आमदार सुनील प्रभू यांनी यावर भाष्य करताना असे म्हटले की, त्या व्हिडीओची सत्यता पडताळून कारवाई करावी कारण यामध्ये ठाकरे गटातील अनेक शिवसैनिक आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. तर शिवसेनेतील मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘झालेल्या प्रकारावरून राजकारणाचा स्तर खालवत चालला आहे हे लक्षात येते आणि त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे शीतल म्हात्रे यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ आहे. एखाद्या महिलेल्या अशाप्रकारे बदनाम करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. अशा गोष्टी महिलांबाबत घडल्या तर महिलांचं राजकारणात येण्याचं प्रमाण कमी होईल.’ असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 13, 2023 03:26 PM