इर्शाळवाडी दुर्घटनेतील जखमींचा खर्च सरकार करणार, पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

“इर्शाळवाडी दुर्घटनेतील जखमींचा खर्च सरकार करणार”, पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

| Updated on: Jul 20, 2023 | 12:59 PM

रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 75 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान उदय सामंत यांनी यावेळी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

रायगड, 20 जुलै 2023 | रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 75 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची दोन पथकं बचावकार्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. या बचाव पथकांचं शोधकार्य सुरू आहे. तसेच रायगडचे पालकमंत्री उद्योगमंत्री उदय सामंत आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे घटनेची पाहणी करण्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत. दरम्यान उदय सामंत यांनी यावेळी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

Published on: Jul 20, 2023 12:58 PM