सुनील शिंदे यांची नाराजी मुख्यमंत्री शिंदे दूर करणार? उदय सामंत म्हणतात…
ठाकरे गटाला लागलेली फुटीची गळती अजूनही थांबलेली नाही. शिशीर शिंदे, मनीषा कायंदे यांच्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे वरळीतले नेते सुनील शिंदे हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. यावर प्रश्न विचारताच शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : ठाकरे गटाला लागलेली फुटीची गळती अजूनही थांबलेली नाही. शिशीर शिंदे, मनीषा कायंदे यांच्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे वरळीतले नेते सुनील शिंदे हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. यावर प्रश्न विचारताच शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सुनील शिंदे हे कार्यक्षम नेते होते, दुर्दैवाने त्यांना विधान परिषदेवर जावं लागलं. पण त्याग काय असतो हा सुनील शिंदे यांनी दाखवून दिलेला आहे. सुनील शिंदे यांच्या समोर आव्हान उभं राहणं ही चुकीची बाब आहे. ते नाराज आहेत की नाही मला माहित नाही पण जर ते नाराज असतील तर एकनाथ शिंदे यांना भेटीतील, त्यांची नाराजी नक्कीच एकनाथ शिंदे दूर करतील आणि स्वागत करतील,” असं उदय सामंत म्हणाले.
Published on: Jun 21, 2023 09:24 AM