प्रभू श्रीराम तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही, संजय राऊत यांचा रोख नेमका कुणावर?
अयोध्येतील राम मंदीर सोहळ्याच्या निमंत्रणावरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. चित्रपटसृष्टीतील सर्वांना खास आमंत्रण दिलं, असे म्हणत असताना ठाकरे कुटुंबाचा लढ्याशी महत्त्वाचा संबंध होता. तर प्रभू श्रीराम तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल केलाय.
मुंबई, २० जानेवारी २०२४ : येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण होत आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अशातच अयोध्येतील राम मंदीर सोहळ्याच्या निमंत्रणावरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. चित्रपटसृष्टीतील सर्वांना खास आमंत्रण दिलं, असे म्हणत असताना ठाकरे कुटुंबाचा लढ्याशी महत्त्वाचा संबंध होता. तर प्रभू श्रीराम तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. रामाची पूजा करतात आणि रावणाचं राज्य चालवतात, अशी घणाघाती टीकाही संजय राऊत यांनी केली. तर यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी खोचक टोला लगावला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाचं निमंत्रण लवकर पोहोचावं यासाठी स्पीड पोस्टनं पाठवलं आहे. निमंत्रण लवकर पोहोचवं म्हणूनच स्पीड पोस्ट पोस्टनं पाठवल्याचे म्हणत उदय सामंत यांनी खोचकपणे पलटवार केलाय.

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय

'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी

'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात

'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
