आदित्य ठाकरे यांच्या 'त्या' ट्वीटवर उदय सामंत यांचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले...

आदित्य ठाकरे यांच्या ‘त्या’ ट्वीटवर उदय सामंत यांचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले…

| Updated on: Sep 26, 2023 | 5:58 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत १ ऑक्टोबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र हा परदेश दौरा रद्द करण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांचा परदेश दौरावर ट्वीट करत खोचक टोला लगावला, यावरच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे

मुंबई, २६ सप्टेंबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत १ ऑक्टोबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार होते. इंग्लंडसह जर्मनी असा १० दिवसांचा परदेश दौरा ते करणार होते. मात्र हा परदेश दौरा पुढे ढकलल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या परदेश दौऱ्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘एकनाथ शिंदे यांनी कोणाच्याही ट्वीटला घाबरून हा दौरा रद्द केला नाहीये. एकनाथ शिंदे संवेदनशील मुख्यमंत्री आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांनी तीन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडलाय. त्यामुळे या दौऱ्यावर जाणं आता योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी कोणाला घाबरण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही’

Published on: Sep 26, 2023 05:58 PM