मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 09, 2022 | 1:43 PM

राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार अखेर आज सकाळी 11 वाजता राजभवनावर पार पडला. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली.

“मला पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. आम्ही नक्कीच या संधीचं सोनं करू आणि भविष्यात महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. यात कोणीही नाराज नाही. हा पहिल्या टप्प्याचा विस्तार आहे. शिवसेनेच्या 9 आमदारांनी आणि भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दुसऱ्या टप्प्याचा विस्तार अजून बाकी आहे. अधिवेशनानंतर दुसऱ्या टप्प्याचा विस्तार लवकरात लवकर होईल”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार अखेर आज सकाळी 11 वाजता राजभवनावर पार पडला. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली.