आदित्य ठाकरे म्हणतात उद्योगमंत्र्यांना 'वेदातां'बाबत माहिती नाही;...तर महाविकास आघाडीने पेपर दाखवावेत, उदय सामतांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

आदित्य ठाकरे म्हणतात उद्योगमंत्र्यांना ‘वेदातां’बाबत माहिती नाही;…तर महाविकास आघाडीने पेपर दाखवावेत, उदय सामतांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

| Updated on: Sep 16, 2022 | 3:01 PM

आज रत्नागिरीमध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सभा पार पडली. त्यांनी यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मात्र त्यानंतर लगेचच उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

आज रत्नागिरीमध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सभा पार पडली. या सभेत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.  उद्योगमंत्र्यांना वेदातांबाबत माहितीच नव्हते असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी बोलताना उदय सामंत यांनी म्हटलं की वेदातांबाबत मविआच्या बैठका झाल्या असा दावा आदित्य ठाकरे हे करत आहेत. मात्र वेदांताबाबत मविआकडे कुठलेही पेपर नाहीत. आदित्य ठाकरे हे जनतेची दिशाभूल करत आहेत. हायपावर कमिटीची बैठक आठ महिने  का झाली नाही? याचं उत्तर आदित्य ठाकरे यांनी द्याव असं सामतं यांनी म्हटलं आहे.

Published on: Sep 16, 2022 02:33 PM