शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का पवार? सवाल करत उदयनराजेंचा शरद पवारांवर निशाणा
बैलगाडीवर स्वार होत उदयनराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. या रॅलीच्या माध्यमातून राजेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. साताऱ्याच्या राजवाड्यातून त्यांची रॅली निघाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे राजकीय वाद बाजूला सारत राजेंसोबत शिवेंद्र राजेही होते. बैलगाडीचा एक कासरा राजेंच्या हातात तर दुसरा शिवेंद्र राजेंच्या हातात दिल्याचे दिसले.
साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. खास बैलगाडीतून रॅली काढून उदयनराजे भोसले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. प्रतिस्पर्धी शशिकांत शिंदे यांच्यावरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शशिकांत शिंदे यांचे घोटाळे दाबण्यासाठी शरद पवार सभा घेणार का? असा सवाल उदयनराजे यांनी केलाय. बैलगाडीवर स्वार होत उदयनराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. या रॅलीच्या माध्यमातून राजेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. साताऱ्याच्या राजवाड्यातून त्यांची रॅली निघाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे राजकीय वाद बाजूला सारत राजेंसोबत शिवेंद्र राजेही होते. बैलगाडीचा एक कासरा राजेंच्या हातात तर दुसरा शिवेंद्र राजेंच्या हातात दिल्याचे दिसले. दरम्यान उदयनराजे यांची लोकसभेची लढत ही शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यासोबत असणार आहे, त्यामुळे नक्की विजयाचा हार कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.