अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
महायुतीकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर उदयनराजे भोसले यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे लोकसभेचे उमेदवार असणार आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांमध्ये लोकसभा निवडणुकीची लढत पाहायला मिळणार आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून सातारा लोकसभेच्या जागेवरून तिढा काही सुटत नव्हता. मात्र आज तो तिढा अखेर सुटल्याचे पाहायला मिळत आहे. कारण महायुतीकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर उदयनराजे भोसले यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे लोकसभेचे उमेदवार असणार आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांमध्ये लोकसभा निवडणुकीची लढत पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे त्यांनी प्रचारही सुरु केला होता. मात्र त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती, अखेर आज ती अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, लोकसभेसाठी मंगळवारी भारतीय जनता पक्षाकडून बारावी यादी जाहीर करण्यात आली. त्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव उदयनराजे भोसले यांचे नाव असल्याचे पाहायला मिळाले.