उदयनराजे-फडणवीसांमध्ये रात्री उशिरा भेट, काय झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा?

उदयनराजे-फडणवीसांमध्ये रात्री उशिरा भेट, काय झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा?

| Updated on: Mar 20, 2024 | 3:44 PM

सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भात या दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि रात्री उशिरा उदयनराजे-फडणवीसांमध्ये ही भेट झाली. तब्बल दोन तास खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली.

मुंबई, २० मार्च २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत. अशातच राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भात या दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि रात्री उशिरा उदयनराजे-फडणवीसांमध्ये ही भेट झाली. तब्बल दोन तास खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यामध्ये केवळ लोकसभेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. भाजपकडून उमेदवारांच्या दोन याद्या आतापर्यंत जाहीर झाल्या असून त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव जाहीर झालं नाही त्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले होते. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले हे नाराज असल्याची चर्चा होती. अशात उदयनराजे भोसलेंनी फडणवीसांची भेट घेतली असून, या भेटीत देखील याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Mar 20, 2024 03:44 PM