Udayanraje Bhosale : देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवर उदयनराजे यांची प्रतिक्रिया
सकाळचा शपथविधी हा शरद पवारांच्या सहमतीनेच झाल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर खासदार उदयनराजे काय म्हणाले पाहा...
मुंबई : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उदय सामंत यांची भेट घेतली. ते म्हणाले की, सातारा जिल्ह्यामध्ये नारायण राणे यांना आणायचं आहे, एमएसईबीचा केंद्रातला आणि राज्याचा एक मोठा कॅम्प तिथे उभं राहायचं आहे आणि तिथल्या तरुणांना कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करून द्यायचे आहे याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर प्रत्येकाच्या मनात ऊर्जा निर्माण होते. भव्य अशी शिवजयंती या वर्षी साजरी होईल. असं देखील ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया
ज्याची मला कल्पना नाही त्याबद्दल मी काय बोलणार, मी त्या बैठकीलाच नव्हतो. अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
टीव्ही ९ मराठी वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. शरद पवार यांच्या सहमतानेच सकाळचा शपथविधी झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.