‘त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली’, भरसभेत अजितदादांची धक्कादायक कबुली
सातारची उदयनराजे भोसले यांची जागा ही पिपाणी आणि तुतारी चिन्हाच्या गोंधळामुळे जिंकलो. त्या गोंधळामुळे आमची इज्जत राहिली, अशी धक्कादायक कबुली अजित पवार यांनी जाहीर सभेतून दिली. ज्या चिन्हाच्या वादावरून पराभूत उमेदवार शशिकांत शिंदेंसह शरद पवार गटाची तक्रार असताना त्या तक्रारीलाच अजित पवारांनी दुजोरा दिलाय.
भाजपने केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपावर हयात नसलेल्या आर.आर आबांवर खापर फोडल्यानंतर अजित पवारांनी साताऱ्यात पुन्हा एक सेल्फ गोल केलाय. शरद पवारांची तुतारी आणि अपक्ष उमेदवाराला देण्यात आलेली पिपाणी या चिन्हच्या गोंधळामुळे साताऱ्यात भाजपची जागा येऊन भाजपची इज्जत वाचली अशी कबुली खुद्द अजित पवारांनीच दिली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आणि अपक्ष उमेदवाराला मिळालेलं पिपाणीला तुतारी म्हणण्यास निवडणूक आयोगानं तुतारी म्हणण्यास होकार दिलाय. त्यावरून शरद पवार यांनी कोर्टात तक्रार केली असताना अजित पवारांच्या वक्तव्यानं त्या तक्रारीला बळ मिळालंय. साताऱ्यात लोकसभेवेळी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे उमेदवार होते. त्यांचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह… यावर त्यांना ३२ हजार ७७१ मतं पडली आणि ते पराभूत झाले. तर टम्पेट म्हणजेच पिपाणी या चिन्हावर लढलेल्या संजय गाडे यांना ३७ हजार ६२ मतं मिळालीत. तर उदयनराजे यांच्या विजयानंतर पिपाणी या चिन्हावर लढलेल्या संजय गाडे यांनी उदयराजेंच्या अभिनंदनासाठी गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तुतारी आणि पिपाणी या चिन्हामध्ये नेमका गोंधळ का होता? बघा व्हिडीओ