Udayanraje Bhosale | उदयनराजे भोसले जेव्हा कार्यकर्त्यांसाठी खास गाणं गातात..
खासदार उदयनराजे यांचे चाहते त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे उदयराजे भोसले यांनी आपल्या या सर्व कार्यकर्त्यांसाठी खास गाणं सादर केलं.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosle ) यांची तरुणांमध्ये असलेली क्रेझ वेगळं सांगण्याची गरज नाही. तरुणांमध्ये उदयराजे भोसले यांची ही क्रेझ का आहे हे तुम्हाला या व्हिडिओ मधून कळालीच असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचं वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले यांचे हजारो चाहते आहेत. महत्त्वाचं म्हणजे उदयनराजे भोसले यांच्या हृदयात ही त्यांच्या चाहत्यांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल तितकंच प्रेम आणि आपुलकी देखील आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी खास गाणे गायले आहे. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त रोहित राऊत लाईव्ह कन्सर्ट कार्यक्रमात त्यांनी हे गाणं गायलंय. “तेरे बिना जिया जाए ना” हे गाणं गात असताना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील वेगळाच जोश दिसत होता. साताऱ्यातील गांधी मैदानात आयोजित कार्यक्रमास सातारकरांची तुफान गर्दी केली होती.