साताऱ्यात उदयनराजे Vs पृथ्वीराजबाबा? ‘या’ जागेवर अदला-बदल?
सातारा लोकसभेत उदयनराजे भोसले यांच्याविरोधात पृथ्वीराज चव्हाण उतरण्याची चिन्ह आहेत. जयंत पाटील यांच्यासोबत पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बंद दाराआड तासभर चर्चा झाली आहे. मात्र उमेदवारी ठरल्यास पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या पंज्यावर लढणार की शरद पवार यांच्या तुतारीवर लढणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
सातारा लोकसभेत उदयनराजे भोसले यांच्याविरोधात पृथ्वीराज चव्हाण उतरण्याची चिन्ह आहेत. जयंत पाटील यांच्यासोबत पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बंद दाराआड तासभर चर्चा झाली आहे. मात्र उमेदवारी ठरल्यास पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या पंज्यावर लढणार की शरद पवार यांच्या तुतारीवर लढणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या बैठकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. विद्यमान खासदार प्रकृतीच्या कारणामुळे श्रीनिवास पाटलांनी पुन्हा निवडणूक लढण्यास नकार दिलाय. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण आणि शशिकांत शिंदे या दोघांच्या नावांची चर्चा आहे. मात्र जर पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव फिक्स झाल्यास चव्हाण तुतारी की पंजा,कोणत्या चिन्हावर लढणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. माहितीनुसार, सातारा आणि भिवंडीच्या जागेवर काँग्रेस आणि शरद पवार गटात अदला-बदल होण्याचीही शक्यता आहे. मुख्यमंत्री पदाबरोबर दिल्लीचा अनुभव म्हणून चव्हाणांचं पारडं जड आहे. स्वच्छ चेहरा आणि स्थानिक पातळीवर सर्वांशी चांगले संबंध आहेत. कराड लोकसभा अस्तित्वात असताना चव्हाण ३ वेळा खासदार राहिलेत, त्यामुळे आता त्यांना उमेदवारी मिळणार की नाही? हे पाहावं लागेल.