'महाराष्ट्रात रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम...', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल

‘महाराष्ट्रात रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम…’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Jan 12, 2025 | 4:58 PM

'रामदास कदम छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होते, त्यांनी काय घोळ केले आणि किती घोळ केले, हे सर्व मला माहित आहे.', चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. ‘रामदास कदम छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होते, त्यांनी काय घोळ केले आणि किती घोळ केले, हे सर्व मला माहित आहे. किती जातीयवाद केला हे ही मला माहित आहे’, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं. पुढे ते असेही म्हणाले, जातीयवादाचा उगम महाराष्ट्रात रामदास कदम यांच्यापासून झाला आहे. म्हणून त्यांनी काही जास्त बोलू नाही, शिवसेना प्रमुखांनी त्यांना मंत्री केले होते, रामदास कदम जुने मित्र आहेत, त्यामुळे त्यांनी शांत राहिले पाहिजे, असा खोचक सल्लाही चंद्रकांत खैरे यांनी दिला. तर महायुतीने त्यांच्या मुलाला मंत्रीपद दिलं आहे, ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे तुम्ही मोठे आणि मंत्री झालात, अशावेळी यांना तुम्ही विसरू नये, त्यांना उलटे बोलू नये, असा माझा रामदास भाईंना मित्र म्हणून सल्ला असल्याचे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे यांनी रामदास कदम यांच्यावर घणाघात केला.

Published on: Jan 12, 2025 04:58 PM