उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली...  ठाकरे गटाचं नवं गाणं पाहिलंत?

उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली… ठाकरे गटाचं नवं गाणं पाहिलंत?

| Updated on: Apr 07, 2024 | 2:58 PM

ठाकरे गटाकडून ठाकरे गटाचं नवं गाणं प्रदर्शित करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाकडून हे नवं गाणं प्रदर्शित केल जात असल्याने चर्चांना एकच उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. जय हिंद... जय महाराष्ट्र अशी घोषणा देखील या टीझरमध्ये बघण्यास आणि ऐकण्यास मिळत आहे.

ठाकरे गटाकडून ठाकरे गटाचं नवं गाणं प्रदर्शित करण्यात येणार आहे. आजच ठाकरे गटाच्या नव्या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात येणार आहे. उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली… अशा आशयाचं हे ठाकरे गटाचं नवं गाणं असणार आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाकडून हे नवं गाणं प्रदर्शित केल जात असल्याने चर्चांना एकच उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. जय हिंद… जय महाराष्ट्र अशी घोषणा देखील या टीझरमध्ये बघण्यास आणि ऐकण्यास मिळत आहे. विशेष म्हणजे याला बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज असल्याचे ऐकण्यास मिळतेय. उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली… निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली… या ओळीने ठाकरे गटाच्या नव्या गाण्याची सुरूवात होताना दिसतेय. यामध्ये काही शिवसैनिकांच्या हातात मशाली दिसताय तर गद्दारांना माफी नाही… असे लिहिलेले फलकही त्या शिवसैनिकांच्या हातात दिसताय.

Published on: Apr 07, 2024 02:57 PM