राहुल नार्वेकर लबाड अन्…, उद्धव ठाकरे यांचे विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा ठाकरे गटाच्या विरोधात असल्याने आजही टीका होतेय. धाराशिवच्या कळंब येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या कार्यक्रमात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केला.
मुंबई, ८ मार्च २०२४ : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा ठाकरे गटाच्या विरोधात आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आजही टीका केली जात आहे. धाराशिवच्या कळंब येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या कार्यक्रमात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केला. उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, “राहुल नार्वेकर लबाड आहेत. आता भाजपकडून लोकसभा निवडणूक लढत आहेत. मी आज आरोपच करतोय. तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालच दाखवून तुम्ही माझ्या शिवसेनेच्या विरोधात निरोप द्यायला लावलात हा माझा आरोप आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने काल म्हटलं आहे, तुम्ही म्हणजे त्या लवाद्याने जो निकाल दिलेला आहे, तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात वाटत नाही काय? हा सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे”, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला. तर या आरोपावर राहुल नार्वेकर काय म्हणाले बघा….