VIDEO : Thackeray-Fadnavis Meet at Kolhapur | एकत्रच पाहणी करू, नार्वेकरांच्या निरोपानंतर ठाकरे-फडणवीस भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज पुरग्रस्त कोल्हापुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेते कोल्हापुरच्या पुरग्रस्त अशा शाहुपुरीची पहाणी करत असताना एकमेकांसमोर आणि बोललेही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज पुरग्रस्त कोल्हापुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेते कोल्हापुरच्या पुरग्रस्त अशा शाहुपुरीची पहाणी करत असताना एकमेकांसमोर आले, दोघेही भेटले, आणि बोललेही. राज्यातले दोन टॉपचे नेते असे अचानक भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस कळालं की, फडणवीसही त्याच भागात पहाणी करतायत, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना शाहुपुरीतच थांबण्याचा निरोप दिला. हवं तर वेगवेगळी पहाणी करण्यापेक्षा, एकत्र पहाणी करु असा आग्रही ठाकरेंनी धरला. त्यानंतर फडणवीसांनीही मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत, ते शाहुपुरीतच थांबले आणि दोघांची भेट अशा पद्धतीनं झाल्याचं कळतंय.
Latest Videos